MAHIT NASLELA HITLER (Marathi Edition)


Worth: ₹ 99.00
(as of Jul 29,2021 11:46:55 UTC – Particulars)


पहिल्या महायुद्धातील एक तरूण जर्मन सैनिक-अ‍ॅडॉल्फ हिटलर.

पुढील वीस-एक वर्षांत या जर्मन सैनिकानं केलेल्या कृतींबद्दल कधी आपल्याला कौतुकमिश्रीत आदर वाटतो, तर कधी त्याच्याविषयी तिरस्कारानं आपलं मन भरून जातं. या तिरस्कृत वाटणार्‍या गोष्टी जर त्यानं टाळल्या असत्या तर त्याच्यातील अनेक गुणांमुळे तो कदाचित आज सर्व जगाला आदर्शवत वाटणार्‍या व्यक्तींच्या यादीत समाविष्ट झाला असता.

आपल्या जर्मनीने संपूर्ण जगावर राज्य करावे, आपल्याला संपूर्ण जगाने जगज्जेता मानावे, आपण जगातील सर्वात प्रसिद्ध व्यक्ती बनावे, प्रत्येकाच्या तोंडी आपलाच विचार असावा, हे जग जिवंत असेपर्यंत प्रत्येकाच्या तोंडी आपलेच नाव असावे अशा प्रकारची हिटलरची स्वप्ने होती. त्याप्रमाणे तो प्रसिद्ध, जगप्रसिद्ध झालाही, परंतु दुर्दैवाने अतिशय वाईट अर्थाने! आजही अनेक प्रसंगी जगाच्या कानाकोपर्‍यात त्याची आठवण काढली जाते, त्याच्याबद्दलची पुस्तके वाचली जातात. स्वत:च्या कृत्यांमुळे प्रचंड निंदेला, टीकेला पात्र ठरलेला हा हुकूमशहा, त्याच्यात असलेल्या अनेक गुणांमुळे अनेकांच्या कौतुकाचाही विषय झाला होता आणि आहे. आज, प्रकटरित्या त्याचं कौतुक करणं मात्र कोणाहीकडून केलं जात नाही हेही तितकंच खरं.

अशा कर्तबगार, हुशार, धाडसी, आपल्या देशाच्या भल्यासाठी अगदी वेड्या झालेल्या, परंतु कित्येक प्रसंगी टोकाच्या क्रूरतेचे प्रदर्शन केलेल्या जर्मनीच्या या हुकूमशहाबद्दलच्या अनेक कहाण्या प्रकाशात आल्या आहेत, येत आहेत. तुम्ही यापूर्वी हिटलर वाचला नसेल तर उत्तमच. पण जरी तुम्ही वाचला असेल, तरी आतील प्रत्येक पानात तुम्हाला कळणार आहे, तुम्हाला माहीत नसलेला हिटलर!

See also  Std 10 | Sanskrit Anand Navneet | Digest | Marathi Medium | Maharashtra State Board | SSC
iamin.in participates in the Amazon Services LLC Associates Program, an affiliate advertising program designed to provide a means for sites to earn advertising fees by advertising and linking to Amazon.in. Amazon and the Amazon logo are trademarks of Amazon.in, Inc. or its affiliates.iamin.in is a participant in the Amazon Services LLC Associates Program, an affiliate advertising program designed to provide a means for sites to earn fees by advertising and linking to Amazon.in. Some links on this site will lead to a commission or payment for the site owner.